Tuesday, September 22, 2009

नभ दाटलं ...

नभ दाटलं ...

नभ दाटलं दाटलंतेज झाकलं झाकलंजलदांच्या भारानंआभाळ ही वाकलं ।
........
डुले गवताची पातरुजुनीया धरतीतघेउनीया नजरेतंस्वप्नं पहिलं-वहिलं ।
धावे बेभान हा वारागावातूनं,
रानातूनंलाल, काळ्या धुळीनंविश्वं सारं कोंदलं ।
नादावल्या दिशा दाहीधरतीही आसावलीबीज तिच्या गर्भाततेज जणू साचलं ।
दीप सारे मालवलेपक्षी जाई घरट्यासवरुणाच्या चाहूलीनंचित्त धरेचं भारलं ।
झर झर बरसतीथेंब टपोरे मोतीउतरुनी अलगदअंग भुईचं भिजलं ।
कोंब हिरवा इवलापाही मान उंचवूनविश्वाच्या या पटावरचित्र सुखाचं रेखलं

No comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails