मैत्री असावी
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी ,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी ॥
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून ,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी ...
कधी शिकवण कधी आठवण ,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण ...
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी ,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी .........
माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा ,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा ॥
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय ,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा ...
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय ,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय ॥
जीवनाच्या वळणांवर वेगळेचं रंग रंगवणारी .....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी
No comments:
Post a Comment